पुणे विभागात दिवसभरात 403 पॉझिटिव्ह रुग्ण, कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 8 हजारांच्या पार

एकट्या पुणे जिल्हयात आतापर्यंत 6 हजार 604 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे.

पुणे |  पुणे विभागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. आतापर्यंत विभागात 8 हजार 122 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर एकूण 377 जणांचा कोरोनामुळं बळी गेला आहे. तसेच 3 हजार 841 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं असल्याची माहिती विभागीय आयुक्त दिपक म्हैसकर यांनी दिली आहे. विभागातील एकूण रुग्णांपैकी एकट्या पुणे जिल्हयात कोरोनाचे 6 हजार 604 इतके रुग्ण असून यातील 3 हजार 355 रुग्णांना घरी सोडण्यात आहे. तर 295 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात पुणे विभागात एकूण 403 ने रुग्ण आढळून आले आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 301, सातारा जिल्ह्यात 59, सोलापूर जिल्ह्यात 32, सांगली जिल्ह्यात 6, आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 5 रुग्णांचा समावेश आहे. अशी रुग्ण तर सातारा जिल्हयात 394 रुग्ण असून 122 बाधित रुग्ण बरे होवून घरी सोडले आहेत व एकूण 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याच बरोबर सोलापूर जिल्हयात 653 रुग्ण असून 297 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे व 64 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच सांगली जिल्हयात 88 रुग्ण असून 47 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयात 383 रुग्ण असून 20 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर 3 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसकर यांनी दिली आहे.



AM News Developed by Kalavati Technologies