अबब..! पुण्यात दिवसभरात 1 हजार 249 कोरोनाबाधितांची वाढ; रुग्णसंख्या पोहोचली 63 हजार 286 वर

जिल्ह्यात सध्या 17 हजार 33 रुग्णांवर उपचार सुरू असुन; 44 हजार 774 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे

पुणे । पुणे जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. वाढती रुग्णसंख्या आता पुणेकरांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. आज दिवसभरात 1,249 जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यामुळे जिल्ह्याची रुग्णसंख्या 63 हजार 286 वर पोहोचली आहे. काल दिवसभरात 1,168 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत एकूण 44 हजार 774 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सध्या जिल्ह्यात 17 हजार 33 रुग्णांवर उपचार सुरू आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत 1479 जणांचा मृत्यू झाला आहे.AM News Developed by Kalavati Technologies