लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार, नराधम अटकेत

बसची वाट पाहत थांबलेल्या एका चाळीस वर्षीय महिलेला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने दुचाकीस्वाराने अज्ञात स्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला केल्याची घटना घडली होती

पुणे | बसची वाट पाहत थांबलेल्या एका चाळीस वर्षीय महिलेला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने दुचाकीस्वाराने अज्ञात स्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला आणि तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुबाडल्याचा प्रकार मुंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोमवारी दुपारी घडला होता. या प्रकरणाची तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी जलद गतीने तपास करत 24 तासात आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. रामचंद्र बनसोडे असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला फाथीमा नगर ते लोणी काळभोर या मार्गावर बसची वाट पाहात उभी होती. याच वेळी दुचाकीवरून आलेल्या आरोपीने फिर्यादी महिलेला कुठे जायचे अशी विचारणा केली? महिलेने त्याला सांगितल्यानंतर मी सुद्धा लोणी काळभोरला चाललो आहे असे सांगत फिर्यादीला लिफ्ट दिली. त्यानंतर त्याने दुचाकी अज्ञात स्थळी नेऊन महिलेवर बलात्कार केला आणि तिच्या अंगावरील दागिने काढून पळ काढला. अशी माहिती फिर्यादी महिलेने पोलिसांना दिली होती. 

आरोपीचे वय 50 ते 55 च्या दरम्यान असून त्याच्या दातावर काळा डाग असल्याची माहिती फिर्यादी महिलेने पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून घेत आरोपीचा शोध सुरू केला. दरम्यान फिर्यादी महिलेने सांगितलेल्या वर्णनानुसार हडपसर परिसरातील काळेपडळ येथे राहणाऱ्या रामचंद्र बनसोडे याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुरुवातीला तो 'तो मी नव्हेच' या अविर्भावात पोलिसांच्या प्रश्नाची उत्तरे देत होता. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांने आपला गुन्हा कबुल केला. पोलिसांनी त्याला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.



AM News Developed by Kalavati Technologies