कोरोनाच्या भीतीने कोल्हापूरातील खासगी दवाखाने बंद, रुग्णांचे हाल

कोल्हापूर | खेड्यापाड्यातील दवाखाने बंद झाल्याने रुग्णांची गैरसोय

कोल्हापूर | राज्यात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातल्याने सगळेच हवालदिल झाले आहेत. अशावेळी कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करून त्यांना बरे करण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करत आहे. पण कोरोनाच्या धास्तीपोटी इतर आजारांवर उपचार करणारे खाजगी डॉक्टर दवाखाने बंद करत असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्रात ही परिस्थिती दिसून आल्याने मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी खाजगी दवाखाने बंद करू नयेत नागरिकांचे उपचार करणे गरजेचे आहे असं आवाहन केलं आहे. मात्र तरीसुद्धा काही ठिकाणी असणारे क्लिनिक बंद ठेवण्यात आली आहेत.

देशावर ओढवलेल्या या संकटामुळे डॉक्टर देवदूताचे काम करत असताना खेड्यापाड्यात असणारी खाजगी क्लिनिक्स बंद झाल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात असणाऱ्या प्रत्येक परिसरातले खाजगी दवाखाने पूर्ण बंद केल्याने ग्रामीण भागातील लोकांसमोर उपचाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कोरोनाची धास्ती न बाळगता डॉक्टरांनी नागरिकांना आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.AM News Developed by Kalavati Technologies