राज्यात आमचे नाही, शिवसेनेचे सरकार आहे, कॉग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची ऑडिओ क्लिप व्हायरल

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची कार्यकर्त्यासोबत संवाद साधत असतांनाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.

मुंबई | राज्यात महाविकासआघाडीचे सरकार नसून शिवसेनेचे सरकार आहे असं वक्तव्य कॉग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एका कॉलवर केलं आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची कार्यकर्त्यासोबत संवाद साधत असतांनाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये पृथ्वीराज चव्हाण आणि एका व्यक्तीमध्ये दूरध्वनीवरून संवाद सुरू आहे. स्थानिक भागासाठी निधीच्या अपेक्षेने एका व्यक्तीने पृथ्वीराज चव्हाण यांना फोन केला होता. त्यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी “मी मंत्रीमंडळात नाही. पण शिफारस करेन. आमचं सरकार नाही, शिवसेनेचे सरकार आहे. असं समोरील व्यक्तीला फोनवर म्हंटल आहे. तसंच कार्यकत्याने तुम्ही आम्हाला मदत केली तर “तुमचं नाव मोठं आहे, तुम्हाला भविष्यात संधी आहे” असं म्हंटल असता. त्यावर चव्हाण यांनी “जेव्हा होती संधी, तेव्हा दिली नाही” अशा शब्दात खदखद व्यक्त केली आहे. मात्र त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांच्या या वक्तव्यामुळं काहीजण महाविकासआघाडी सरकारबाबत प्रश्नचिन्ह उभं करत आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये एकता नाही अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत सहावी जागा लढण्याचा काँग्रेसने हट्ट धरला होता. मात्र निवडणूक बिनविरोध व्हावी असा आग्रह मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा होता. त्यामुळं कॉग्रेसने जरा हट्ट सोडला नाही तर मी निवडणुक लढणार नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हंटल असल्याचंही बोललं जात होतं. त्यावरून कॉग्रेसवर दबाव वाढत चालला होता.अखेर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनचे कारण देत काँग्रेसला सहाव्या जागेचा हट्ट सोडावा लागला होता.AM News Developed by Kalavati Technologies