पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणात मांडले 'हे' मुद्दे

मागील तीन दशकांत 42 हजार निर्दोष लोकांना आपला जीव गमवावा लागला.

नवी दिल्ली । कलम 370 मधील एक कलम वगळता अन्य कलम रद्द केल्यानंतर तसेच जम्मू-कश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश करण्यात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच जनतेला संबोधित करत आहेत. जम्मू-काश्मीरबाबतचा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील असा ऐतिहासिक निर्णय केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने घेतला. जम्मू-काश्मीर बाबतचे कलम 370 रदद् करणारे विधेयक प्रथम राज्यसभेत नंतर लोकसभेत मंजूर केल्यानंतर आता दोन दिवसांनी म्हणजेच आज पंतप्रधान मोदी देशाला उद्देशून भाषण करत आहेत. 

वाचा काय म्हणाले नरेंद्र मोदी -

जम्मू काश्मीरमधील नागरिक विकासापासून दूर होते.

नरेंद्र मोदी कलम 370 मुळे काश्मीरमधील नागरिकांचं नुकसान झालं.

कलम 370 रद्द केल्याने देशातील नागरिकांचं स्वप्न पूर्ण झालं.

लवकरच जम्मू कश्मीर आणि लडाखमधील सर्व रिक्त पदे भरली जातील, यामुळे स्थानिक तरुणांना रोजगार मिळणार.

जम्मू कश्मीरच्या मुलींनाही आता सर्व हक्क आणि अधिकार मिळणार.

जम्मू कश्मीरची मुलं शिक्षणापासून वंचित होते.  35 ए आणि कलम 370 चा गैरफायदा पाकिस्तानने घेतला.

कलम 370 मुळे विकासाला बाधा.

सरदार पटेल यांचे स्वप्न पूर्ण केले.

काश्मीरमधील जनतेचं वर्तमान आणि भविष्य सुधारेल.

जम्मू काश्मीरमधील पंचायत बळकट करणार.

जम्मू काश्मीरमधील लोकप्रतीनिधी जनता निवडणार.

जम्मू काश्मीरमध्ये आता लवकरच निवडणूका.

कलम 370 मुळे फुटीरतावाद, दहशतवाद, परिवारवाद पसरला आणि मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार वाढला.

 काश्मीरचे सर्व प्रकल्प मार्गी लागणार.

जम्मू काश्मीरमध्ये रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील. तसेच जम्मू काश्मीरमध्ये जगातील सर्वात चांगले पर्यटन स्थळ बनण्याची क्षमता.

काश्मीरचा खेळाडू जगात भारताचे नाव रोशन करेल. जम्मू कश्मीरमध्ये तंत्रज्ञानाचा विकास झाल्यास नागरिकांचे आयुष्य सुलभ होईल. क्रीडा प्रबोधनी सुरू करणार, काश्मीरमधून आता नवे खेळाडू निर्माण होतील.

आपल्या देशात कोणतेही सरकार असो. ते संसदेत कायदा बनवून देशाच्या भल्यासाठी कार्य करते.

लडाख हा केंद्र शासित प्रदेशच राहणार

बॉलिवूड, टॉलिवूडला आवाहन करतो की, जम्मू काश्मीरात गुंतवणुकीची आणि चित्रीकरणाची उपलब्ध करा.

मागील तीन दशकांत 42 हजार निर्दोष लोकांना आपला जीव गमवावा लागला. जम्मू-काश्मीर आणि लडाखचा विकास ज्या वेगाने व्हायला हवा होता. तसा झाला नाही.AM News Developed by Kalavati Technologies