...म्हणे माझ्या मुखातून स्वामी समर्थ व साईबाबा बोलतात; भोंदूबाबाकडून चार कोटींचा गंडा, महिलेसह तिघांना अटक

पोलिसांनी संशयित भोंदूबाबा प्रवीण विजय फडणीस, श्रीधर नारायण सहस्त्रबुद्धे, सविता अनिल अष्टेकर या तिघांना पोलिसांनी अटक केली.

कोल्हापूर | आपल्या मुखातून साक्षात स्वामी समर्थ आणि साईबाबा बोलतात, असे भासवून भोंदूबाबाने अनेक जणांची तब्बल 4 कोटी रुपयांची फसवणुक केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित भोंदूबाबा प्रवीण विजय फडणीस, श्रीधर नारायण सहस्त्रबुद्धे, सविता अनिल अष्टेकर या तिघांना पोलिसांनी अटक केली. या तिघांविरुद्ध आतापर्यंत 12 जणांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रारी केल्या आहेत. माहितीनुसार प्रवीण फडणीस हा स्वामी समर्थांचा भक्त आहे. त्याचा मंगळवार पेठेतील सिद्धाळा गार्डन परिसरात मठ आहे. तिथे तो भक्तांना आपल्या अंगात स्वामी समर्थ आणि साईबाबा संचारतात असे सांगत असतो. नियमित येणाऱ्या संदीप प्रकाश नंदगांवकर यांच्यासह 20 भक्तांचा त्याने विश्वास संपादन केला व त्यातून गोशाळा व अन्य कामांसाठी वेळोवेळी पैसे घेतले. सुमारे तीन कोटी 96 लाख 34 हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार आहे.

श्रीधर सहस्रबु्द्धे हा फडणीस याचा गुरू आहे व सविता अष्टेकर ही महिला मठातील सेवेकरी आहे. याप्रकरणी फसवणुकीविरोधात नंदगांवकर यांच्या मुख्य फिर्यादीवरून जुना राजवाडा पोलिसांत महाराष्ट्र नरबळी, अमानुष, अनिष्ट, अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायदा सन 2013 चे कलम 2 (1) (बी) (5) (8) प्रमाणे भारतीय दंडविधान कलम 420, 323, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल केला असून या तिघांना न्यायालयापुढे हजर केले असता त्यांना अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्यापुढे हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. संशयिताच्या मंगळवार पेठ (मठ) घरातून पोलिसांनी एक तलवार, डीव्हीआर, संगणक सीपीयू, कागदपत्रे, आदी साहित्य जप्त केले.AM News Developed by Kalavati Technologies