जम्मू-काश्मीर । राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कलम 370 मधील एक खंड सोडून इतर सर्व समाप्त करण्याच्या अधिसूचनेवर स्वाक्षरी केली आहे. संसदेच्या शिफारशीवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी हा निर्णय घेतला. यासोबतच मंगळवारपासूनच जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा समाप्त झाला. आता केंद्र सरकारचे सर्व कायदे जम्मू-काश्मिरातही लागू होतील.
याबरोबरच जम्मू-काश्मिरात श्रीनगरमध्ये असलेल्या नागरी सचिवालयाच्या इमारतीवर भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा डौलाने फडकू लागला आहे. याबाबतचा एक व्हिडिओ वृत्तसंस्था एएनआयने जारी केला आहे.

Latest visuals from Civil Secretariat in #Srinagar, where #JammuAndKashmir flag along with Tricolor flies atop the building. https://t.co/ezTUyumVix
— ANI (@ANI) August 7, 2019
नरेंद्र मोदी सरकारने सोमवारी राज्यसभेत आणि मंगळवारी लोकसभेतून अनुच्छेद 370 पंगू करण्याची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना शिफारस केली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत म्हटले होते की, जम्मू-काश्मीरमध्ये विकास कार्यास कलम 370 चा मोठा अडथळा होता.