....म्हणून या गरोदर महिलेने पोलिसांचे मनापासून आभार मानले

लाठी मारणारे पोलीस पाहिले आता हाकेला धावून जाणारे ही जाणून घ्या

मुंबई | लाठी मारणारे पोलीस पाहिले आता हाकेला धावून जाणारे तेच खाकी वर्दीतील पोलीस ठरले आहेत. ठाण्यात श्वेता चव्हाण नावाची एक गरोदर महिला लाॅकडाऊनमुळे एकटीच घरात अडकून पडली होती. काही कामा निमित्त श्वेता चव्हाण यांचे पती आणि सासू सासरे त्यांच्या गावी रत्नागिरीला गेले होते. मात्र लाॅकडाऊनमुळे सर्वच वाहतूक बंद असल्याने त्यांना परत ठाण्यात येणे शक्य होत नाहीये. त्यात श्वेता या ३ महिन्यांच्या गरोदर असल्याने त्यांना जास्त उठबस करता येत नव्हती. शिवाय जर काही आपत्ती जनक परिस्थिती निर्माण झाली असती तर श्वेता यांच्या मदतीला कोणीच नसल्याने श्वेता यांची भिती वाढू लागली होती.

आपल्या आईकडे कामोठेला जाणे श्वेता यांच्या करता खुप महत्वाचे होते पण लाॅकडाऊनमुळे त्यांना आईकडे जाणे जवळपास शक्य नव्हते. पण त्यांनी आशा सोडली नाही आणि थेट ठाणे पोलीस कंट्रोल रुम मध्ये फोन केला आणि काही वेळातच ठाणे पोलीस त्यांच्या मदतीकरता दारात हजर राहिले. पोलीस निरीक्षक सचिन गावडे यांनी महिलेला काय मदत पाहिजे हे विचारले आणि सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद असल्याचे लक्षात घेऊन श्वेता चव्हाण यांच्याकरता त्यानुसार एका खाजगी वाहनाची व्यवस्था करुन एक पोलीस कर्मचारी आणि एक महिला वाॅर्डन देखील सोबत दिले. जेणेकरुन त्या महिलेची कुठेही अडवणूक होवू नये. श्वेता चव्हाण सुखरुप आपल्या आईच्या घरी पोहोचल्या असून त्यांनी पोलिसांचे मनापासून आभार मानलेत.AM News Developed by Kalavati Technologies