गर्भवती महिलेला उपसरपंचासह जमावाकडून लाथा बुक्क्यांनी मारहाण, माणुसकीला काळीमा फासणारी घटना

गर्भवती महिलेच्या फिर्यादीनुसार उपसरपंचासह 9 जनावर हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हिंगोली | जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातील हट्टा येथे एका 9 महिन्याच्या गर्भवती असलेल्या महिलेला गावातील उपसरपंचासह काही जमावाकडून लाथा बुक्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी गर्भवती महिलेच्या फिर्यादीनुसार उपसरपंचासह 9 जनावर हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यात उपसरपंच तथा काही मंडळींनी महिलेकडील लोकांच्या विरोधात जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सुद्धा गुन्हा दाखल केल्याने या प्रकरणात परस्परा विरोधात गुन्हा दाखल झाले आहे. मात्र असे असले तरीही गर्भवती महिलेला जमावाकडून लाथांनी मारहाण करणे माणुसकी हरवल्याची जाण करुन देत आहे. गावातील रुग्णालयासमोर पीडित महिलेसह काही जणांना क्वारंटाईन करण्यात आलं असताना सुद्धा गावातील मंडळींनी घटनास्थळी जाऊन जमावबंदीचे आदेश झुगारल्याने संचारबंदीला सुद्धा हरताळ फासल्याचं दिसून आल आहे. याबाबत योग्य ती पावले उचलली जातील असं मत आमदार राजू नवघरे यांनी एएम न्युज सोबत बोलतांना सांगितलं आहे. सदरील प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे.



AM News Developed by Kalavati Technologies