प्रवेश परिक्षा पुढे ढकला; आदित्य ठाकरेचं पंतप्रधान मोदींना पत्र

कोरोनाच्या काळात प्रवेश परिक्षा पुढे ढकलाव्यात यासाठी पयर्टनमंत्री आदित्य ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहले आहे.

मुंबई । देशात कोरोना प्रादुर्भाव कायम असतांना असताना प्रवेश परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्याने जोरदार विरोध होत आहे. भाजपाव्यतिरिक्त इतर राजकीय पक्षांचा या परीक्षांना विरोध आहे. तसेच विद्यार्थी आणि पालकांना सुद्धा कोरोना काळात परिक्षा घेण्याच्या निर्णयाचा विरोध आहे. अशातच युवासेनेचे प्रमुख तसेच राज्याचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणात उडी घेतली आहे. आदित्य ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहीत या परिक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे.

बहुतेक राज्यांमध्ये कोरोनाचा कहर सुरूच आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रवेश परिक्षा घेणे हा निर्णय चुकीचा आहे. अनेक विद्यार्थी आपल्या पालकांसोबत, आजी-आजोबांसोबत किंवा इतर नातेवाईकांसोबत राहतात. त्यामुळे त्यांच्या जिवालाही धोका निर्माण होऊ शकतो. असे आदित्य ठाकरे यांनी आपल्या पत्रात लिहले आहे. JEE आणि NEEची परीक्षा होणार की नाही या वादाला पूर्णविराम मिळाला आहे. या दोन्ही परीक्षा नियोजित वेळेत होणार असून विद्यार्थ्यांनी अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण नीट आणि जेईई परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहे.

यासंदर्भात राष्ट्रीय परीक्षा एजन्सीनं परिपत्रक जारी केलं आहे. जेईईची मुख्य परीक्षा ठरलेल्या तारखेप्रमाणे 1 ते 6 सप्टेंबरदरम्यान होणार आहे. तर नीट परीक्षा ही 13 सप्टेंबरला होणार आहे. नीट परीक्षेसाठी 15 लाख 97 हजार 433 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. याआधी सर्वोच्च न्यायालयाने जेईई आणि नीट परीक्षा कोरोनामुळे रद्द करण्यासंदर्भात 11 विद्यार्थ्यांची याचिका फेटाळून लावली होती.AM News Developed by Kalavati Technologies