तयारीला लागा...पोलीस शिपाई चालक पदासाठी 1019 पदांची भरती

सरकारच्या गृहविभागाकडून 1019 पोलीस पदाची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

मुंबई | राज्यात पोलीस शिपाई चालक पदासाठी 1019 पदांसाठी भरती होत आहे. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच पोलीस भरती निघाली आहे. राज्य सरकारकडून 1019 पोलीस शिपाई चालक पदांची पोलीस भरती केली जात आहे. अजून मंत्रीमंडळाचा विस्तार झालेला नाही. तसेच गृहमंत्रीही निश्चित नाही. तरीही, सरकारच्या गृहविभागाकडून 1019 पोलीस पदाची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

पोलीस आयुक्तालय, बृहन्मुंबई – 156 जागा

पोलीस आयुक्तालय, ठाणे शहर – 116 जागा

पोलीस आयुक्तालय, नागपूर शहर – 87 जागा

पोलीस आयुक्तालय, नवी मुंबई – 103 जागा

पोलीस आयुक्तालय, अमरावती शहर – 19 जागा

पोलीस आयुक्तालय, औरंगाबाद शहर – 24 जागा

पोलीस आयुक्तालय, लोहमार्ग मुंबई – 18 जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, रायगड – 27 जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, सिंधुदूर्ग – 20 जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी – 44 जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, सांगली – 77 जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, सोलापूर ग्रा. – 41 जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, जालना – 25 जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, बीड – 36 जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, उस्मानाबाद – 33 जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर – 6 जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, नागपूर ग्रा. – 28 जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, भंडारा – 36 जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, वर्धा – 37 जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, अकोला – 34 जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, बुलढाणा – 52 जागा

शैक्षणिक पात्रता – 12 वी उत्तीर्ण

वयोमर्यादा – 28 वर्षांपर्यंत (मागासवर्गीयांना सवलत)

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 22 डिसेंबर 2019

अधिक माहितीसाठी – http://bit.ly/33FiQRG

अर्ज करण्यासाठी - http://bit.ly/2L7zcMMAM News Developed by Kalavati Technologies