नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यासाठी पोलीस चांगली कामगीरी करत आहे - गृहमंत्री अनिल देशमुख

गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी पोलीस चांगल्या रितीने आपले कर्तव्य पार पाडत असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले आहे

नागपूर । नक्षलवाद्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी आमचे पोलीस चांगली कामगीरी करत असल्याचं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. ते नागपूरात पत्रकारांशी बोलत होते. गडचिरोलीमध्ये पोलिसांनी नुकताच काही नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. नक्षलवाद्यांना ड्रोन किंवा काहीही वापरू द्या, आमच्या पोलिसांकडे अत्याधुनिक शस्त्र असून ते नक्षलवादी कारवायांना लगाम घालण्यास सक्षम असल्याचं देशमुख म्हणाले.

नागपूरचे नाव पूर्वी क्राईम कॅपीटल म्हणून ओळखलं जायचं पण आता आम्ही शहरातील क्राईम कमी करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचेही देशमुख यांनी यावेळी सांगितले. नागपूरात कोरोनावर पत्रकारांनी प्रश्न विचारले असता देशमुख म्हणाले की, नागपूरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला होता मात्र पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि मनपानं चांगल्या रितीने आपली कामगीरी बजावली असून, आता नागपूरात कोरोना नियंत्रणात आला आहे. असे देशमुख यांनी सांगितले.AM News Developed by Kalavati Technologies