जालना । 23 दिवसांनंतर मुलीची पोलिसांनी केली सुखरुप सुटका, तिघे पोलिसांच्या ताब्यात

जालन्यातून अपहरण झालेल्या 13 वर्षीय मुलीसोबत हिंगोलीत अत्याचार झाल्याचा संशय

जालना । जालन्यातून अपहरण झालेल्या एका 13 वर्षांच्या मुलीसोबत हिंगोलीत अत्याचार झाल्याचा संशय आहे. शहरातील चंदनझिरा परिसरातून 13 नोव्हेंबरला एका तेरा वर्षांच्या मुलीचं अपहरण झालं होतं. मात्र, अनेक दिवस उलटूनही मुलीचा शोध लागत नसल्यानं पोलिसांवर दबाव वाढत होता. त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या सूचना नंतर पोलिसांनी तपास जलदगतीने वाढवला. दरम्यान, मुलीचे अपहरण हे तिच्या घराघराशेजारी राहणाऱ्या दोन महिला आणि हिंगोली जिल्ह्यातील नातेवाईक दत्ता धनगर यांनी केल्याची खात्रीशीर माहिती खबऱ्यामार्फत मिळाली आहे. त्यानंतर या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असता मुलीचे अपहरण केल्याची कबुली दिली आहे. या मुलीला सेनगावातल्या एका शेत वस्तीत ठेवलं असल्याचं आरोपींनी सांगितल्यानंतर पोलिसांच्या पथकानं घटनास्थळी जावून मुलीची सुखरूप सुटका केली. दरम्यान, या मुलीसोबत अत्याचार झाल्याचा संशय पोलिसांना अजून अधीक चौकशीअंती सत्य बाहेर येणार असल्याची प्रतिक्रिया पोलिसांनी दिली.AM News Developed by Kalavati Technologies