दिल्ली हिंसाचारातील मृतांचा आकडा 27 वर, 106 जणांना पोलीसांकडून अटक

हिंसाचाराच्या आरोपाखाली 18 एफआयआर नोंदविण्यात आले आहे

दिल्ली | नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून राजधानी दिल्लीत तणाव कायम आहे. दिल्लीच्या ईशान्य भागात हिंसाचारातील मृताचा आकडा वाढला आहे. या हिंसाचारात आतापर्यंत 27 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. दिल्ली पोलीसांनी आतापर्यंत 106 लोकांना अटक केली असून याप्रकरणी त्रास आणि हिंसाचाराच्या आरोपाखाली 18 एफआयआर नोंदविण्यात आले आहेत.  मंगळवारी रात्री हिंसाचारग्रस्त राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी दौरा करून हिंसाचारग्रस्त भागाची पाहणी  केली आहे. तसेच नागरीकांना शांतता राखण्याचे आवाहन डोवाल यांनी केले आहे.  नागरीकांशी बोलतांना अजित डोवाल यांनी आपण दिल्ली पोलिसांच्या संरक्षणाखाली पूर्णपणे सुरक्षित आहोत. हिंसाचारात दोषी असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे.

दिल्ली पोलिस पीआरओ एमएस रंधावा यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. पत्रकारांशी बोलतांना श्रीमती रंधावा यांनी सांगितले की सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कारवाई सुरू आहे. भागात मोठ्या प्रमाणात पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. ड्रोन कॅमेराद्वारे परीक्षण केले जात आहे. ज्यांच्या छप्परांवर दगड तसेच लाठ्याकाठ्या दिसत आहे. त्यांच्यावर कारवाई केली जात आहेत. दरम्यान दिल्लीतील परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.AM News Developed by Kalavati Technologies