पंतप्रधानांच्या पुतणीची पर्स चोरीला, तब्बल 700 पोलिसांनी मिळून 24 तासात घेतला चोराचा शोध

मीडिया रिपोर्ट्सनुसार या हायप्रोफाइल प्रकरणाचा तपास करण्यासाठी 700 पोलीस कर्मचारी कामाला लागले होते.

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुतणी दमयंतीबेन मोदी यांची पर्स हिसकावून चोरट्याने पळ काढला. शनिवारी ही घटना घडली. यानंतर दमयंतीबेनने याप्रकरणी गुन्हा नोंदवला. पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत दुसऱ्याच दिवशी म्हणजे रविवारी चोराला बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून चोरलेले सर्व साहित्य जप्त करण्यात आली. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुतणीची पर्स शोधण्यासाठी तब्बल 700 पोलिसांना कामाला लावण्यात आले होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार या हायप्रोफाइल प्रकरणाचा तपास करण्यासाठी 700 पोलीस कर्मचारी कामाला लागले होते. चोरीची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ अॅक्शन घेत चोराची शोधाशोध सुरू केली. अटक करण्यात आलेल्या चोरट्यांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी मिळवले. त्यानुसार, रुट मॅप चेक करत पोलिसांनी जवळपास 200 सीसीटीव्ही फुटेज पडताळले आणि चोराचा शोध घेतला. 700 पोलिसांनी 200 सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने अवघ्या 24 तासांच्याआत 2 चोरांना अटक केली. हरयाणामधील सोनीपतमध्येही जाऊन एका चोरट्याला अटक केली. तर दुसरा आरोपी आकाश याला सुल्तानपुरीमधून पोलिसांनी अटक केली आहे. आकाश याच्याकडून पोलिसांनी दमयंती बेन मोदी यांची पर्स आणि मोबाईल जप्त केला आहे. दमयंतीबेन या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुतणी आहेत. यामुळे पोलिसांना ही केस तात्काळ सोडवणे गरजेचे होते.

दिल्लीमध्ये लूट आणि स्नैचिंगच्या घटना वाढत आहेत. 30 सप्टेंबरपर्यंत तर स्नैचिंगच्या 4762 घटना दिल्ली पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुतणीची केस समोर आल्यानंतर पोलिसांची झोप उडाली आणि अवघ्या 24 तासांच्या आत 700 पोलीस कर्मचाऱ्यांनी मिळून ही पर्स शोधून चोरांना बेड्या ठोकल्या.AM News Developed by Kalavati Technologies