विद्यार्थ्यांना मोदींचा मंत्र - टेक्नॉलॉजीला मित्र बनवा, त्याचे गुलाम बनू नका

पंतप्रधान मोदी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडिअम येथून ते सर्वांशी थेट संवाद साधत आहेत.

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विद्यार्थ्यांसोबत परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमामध्ये संवाद साधत आहेत. परीक्षेच्या काळामध्ये तणावमुक्त कसे राहता येईल याविषयी ते विद्यार्थ्यांना कानमंत्र देत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून मोदी विद्यार्थ्यांशी अशा प्रकारे संवाद साधत आहेत. विविध शाळांमध्ये परीक्षा पे चर्चाचे प्रक्षेपण करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडिअम येथून ते सर्वांशी थेट संवाद साधत आहेत.

यावेळी पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना सर्वात महत्त्वाचा मंत्र दिला आहे. तंत्रज्ञानाचा वापर करता. पण तंत्रज्ञानाला स्वतःच्या जीवनाचा भाग होऊ देऊ नका. दिवसातून एक तास तरी तुम्ही तंत्रज्ञनापासून राहा. घरातील एक खोली अशी करावी ज्यात तंत्रज्ञानाला नो एन्ट्री असावी. त्या खोलीत जो कोणी येईल त्याने सर्व तांत्रिक गोष्टी बाहेर ठेऊनच यावं. तसेच तंत्रज्ञानाला मित्र बनवा पण त्याचे गुलाम बनू नका असेही ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, शतकाच्या शेवटच्या कालखंडामध्ये आणि या शतकाच्या सुरुवातीच्या काळात विज्ञान आणि तंत्रज्ञानाने सर्व काही बदलले आहे. आज तंत्रज्ञानाने आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. तंत्रज्ञानाचे भय बाळगू नका असे ते म्हणाले. तसेच तंत्रज्ञनाला आपला मित्र मानले पाहिजे. तंत्रज्ञान माझ्यासाठी उपयोगी कसे असेल याचा विचार आपण केला पाहीजे. या तंत्रज्ञानाने आपल्यावर कब्जा करता कामा नये. आपण त्याचे गुलाम बनता कामा नये.AM News Developed by Kalavati Technologies