खुशखबर! आता सोन्यावर मिळणार तब्बल 'इतकं' कर्ज, सविस्तर जाणून घ्या...

गोल्ड लोन अर्थात सोन्यावरील कर्जाची व्हॅल्यू वाढवण्याचा निर्णय आरबीआयने घेतलाय.

नवी दिल्ली | रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत पतधोरण जाहीर केले. आरबीआयने व्याज दरात कोणताही बदल केला नाही. बँकेने रेपो रेट आणि रिझर्व्ह रेपो रेट आहे तसाच ठेवला आहे. सध्या रेपो रेट 4 टक्के आणि रिझर्व्ह रेपो रेट 3.3 टक्के इतका आहे. या पत धोरणात बँकेने लोन मोरेटोरिम बाबत दिलासा दिला नाही. पण बँकेने सर्व सामान्य एक मोठे गिफ्ट दिले आहे.

भारतात सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढत आहेत. कोरोना संकटाच्या वेळी ग्राहकांच्या सोयी लक्षात घेऊन आज रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सोने तारण कर्जदारांना मोठी दिलासा दिला आहे. मध्यवर्ती बँकेने सोने तारण कर्जे ठेव योजना आणखी आकर्षक बनविली आहेत. नव्या नियमांनुसार सोन्याच्या दागिन्यांवर बँका आता 90% पर्यंत कर्ज देऊ शकतील. सध्या सोन्याच्या एकूण मूल्याच्या 75% पर्यंत कर्ज उपलब्ध आहे. ही सुविधा 31 मार्च 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात लोकांनी सोने तारण ठेऊन बरेच कर्ज घेतले आहे. ते पाहता आरबीआयने हा निर्णय घेतला आहे. सोन्याच्या कर्जात सोन्याचे दागिने तारण ठेवून कर्ज दिले जाते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. दिवसेंदिवस सोन्याच्या दरात होणारी वाढ बघता आता सोने तारण ठेऊन जास्त प्रमाणात कर्ज घेण्यासाठी आपल्याला अर्ज करता येणार आहे.

सध्या आपल्या जॉब प्रोफाइल आणि क्रेडिट स्कोअरवर अवलंबून वैयक्तिक कर्ज 10 ते 15 टक्क्यांच्या दरम्यान व्याज दरावर उपलब्ध आहे. परंतु जेव्हा सोन्याच्या कर्जाचा प्रश्न येतो तेव्हा ते 8 ते 12 टक्क्यांच्या व्याज दरावर उपलब्ध असतात. वेगवेगळ्या बँकांमध्येही वेगवेगळे व्याज दर असतात. म्हणून जर आपण सोन्याचे कर्ज घेण्याचा विचार करीत असाल तर आपल्याला त्या व्याजाबद्दल आधीपासूनच माहिती असावी.

यातील आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे सोन्याचे कर्ज घेण्यासाठी आपल्याकडे चांगला क्रेडिट स्कोर असणे आवश्यक नाही. परंतु तरीरही क्रेडिट स्कोर चांगला आहे. तर तुम्हाला स्वस्त दरात कर्ज मिळू शकेल. इतकेच नाही तर तुम्हाला गोल्ड लोनमध्ये परतफेड सुलभ पर्याय देखील मिळतील. यामध्ये आंशिक परतफेड देखील उपलब्ध आहे.AM News Developed by Kalavati Technologies