कमलनाथांच्या कर्तृत्वावर लोकांना विश्वास, अजूनही चमत्कार होईल - शरद पवार

'अशा' शब्दात पवारांनी मनसेच्या शॅडो कॅबिनेटला लगावला टोला

मुंबई । मध्य प्रदेशातील राजकीय भूकंप आणत काँग्रेसला धक्का देणारे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजप मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, मंत्री धर्मेंद्र प्रधान, उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे उपस्थित होते. ज्योतिरादित्य शिंदे उद्या भोपाळला जाणार असून ते 13 मार्चला राज्यसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या येण्याने आम्हाला आनंद होत असून त्यांना पक्षात मुख्य प्रवाहात काम करण्याची संधी मिळेस असे पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणाले. दरम्यान, यावर बोलताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार म्हणाले की, कमलनाथ यांच्या कर्तृत्वावर लोकांना विश्वास आहे. अजूनही चमत्कार होईल अस एेकण्यात येत आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, जी संधी द्यायला हवी होती ती द्यायला ऊशीर झाला. मी काॅंग्रेसवर बोलणार नाही.

सरकार काय करतय यावर कोणी लक्ष ठेवत असेल तर चांगली गोष्ट आहे. एक पक्ष म्हणून काहीतरी केल पाहिजे आणि आपण जे करतोय ते लोकांपर्यंत नेल पाहिजे. अशा शब्दात पवारांनी मनसेच्या शॅडो कॅबिनेटला टोला लगावला आहे. हे सरकार उत्तम काम करत आहे. उद्धव ठाकरे सर्वांना एकत्र घेऊन पुढे जात आहेत. हे सरकार पाच वर्ष चालणार आहे. अस म्हणत त्यांनी ठाकरे सरकारच कौतुक ही केलं. AM News Developed by Kalavati Technologies