"मी काय म्हातारा झालोय, अभी तो मै जवान हूँ" - शरद पवार

वयाबद्दल बोलणाऱ्या नेत्यांनाही फटकारले

अकोला । आपलं वय झाल्याचा उल्लेख करणाऱ्यांचा आज शरद पवारांनी चांगलाच मिश्कील समाचार घेतलाय. अभी तो मै जवान हूँ, म्हणत पवारांनी विरोधकांना आव्हान दिलं. वयाचा उल्लेख करणाऱ्या आपल्या पक्षाच्या नेत्यांची फिरकी घेतांना पवार म्हणालेय की, माझ्या वयाबद्दल बोलू नका. मी तूमच्या पक्षाचा अध्यक्ष आहेय हे लक्षात ठेवा. विरोधकांना घरी पाठवूनच आपण घरी जाणार असल्याचं पवार म्हणाले. ते अकोल्यातील बाळापुर मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार संग्राम गावंडे यांच्या प्रचार सभेत बोलत होते.

लोकसभेतील भाजपचा विजय संरक्षण मुद्द्याला भावनिक मुद्दा केल्यानं झाल्याचं पवार म्हणालेय. मोदींच्या घुस के मारूंगाच्या घोषणेवरही पवारांनी तिरकस टिका केली. दरम्यान, आपण शेतकर्यांच्या पिकाला भाव देत असतांना भाजपवाले आपल्याला महागाईचं कारण देत विरोध करायचे. त्यावेळी मी शेतकर्यांसाठी त्यांच्या कांद्याच्या, कवडांच्या माळांकडे दुर्लक्ष केल्याचा टोला पवारांनी लगावलाय.AM News Developed by Kalavati Technologies