डोंबिवलीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये रुग्णांना बेड उपलब्ध नसल्याने रुग्णांचे हाल

हॉस्पिटलच्या वॉर्ड बाहेरच रुग्णांवर उपचार सुरु, डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील धक्कादायक वास्तव समोर

डोंबिवली । कल्याण डोंबिवली महापालिकेकडून आरोग्य सुविधासह वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर बेडची सुविधा करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र सद्यस्थितीत कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णाची संख्या ५५०० वर पोचली असताना पालिका क्षेत्रात केवळ २१०० खाटांचीच व्यवस्था असून ही बाब रुग्णाच्या जीवाशी खेळणारी आहे. मात्र कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आलेल्या आणि श्वास घेण्यास त्रास होत असलेले रुग्ण काही वेळच्या फरकाने रुग्णालयात दाखल होतच असून या रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी रुग्णालयाच्या कानाकोपऱ्यात जिथे जागा मिळेल तिथे रुग्णांना बसवून त्यांना ऑक्सिजन लावले जात आहेत. पालिकेच्या कर्मचाऱ्यांना देखील खाटा मिळत नसून या कर्मचाऱ्यांना देखील शास्त्रीनगर रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरील आणि पॅसेज मधील कठड्यावर बसवून ऑक्सिजन लावण्यात आले आहेत. यामुळेच रुग्णाचा उपचाराविना जीव जाण्याआधीच रुग्णालयीन व्यवस्था सुधारण्याची मागणी त्रस्त रुग्णाकडून केली जात आहे.AM News Developed by Kalavati Technologies