शहरात अन्न पोहचवण्यास झोमॅटो, स्वीगी वाहनांना दिले जाणार पासेस

नागरिकांच्या अन्नाचा प्रश्न मोठा असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे

 
सोलापूर | जनतेच्या सोयीसाठी राज्यातील हॉटेलांना त्यांचे किचन सुरु ठेवून खाद्यपदार्थ घरपोच किंवा सोसायट्यांपर्यंत पोहचवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, खाद्यपदार्थ बनविणाऱ्या व पोहचवणाऱ्या व्यक्तींनी स्वच्छता आणि ‘कोरोना’ सुरक्षिततेची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. शहरात फिरण्यासाठी झोमॅटो, स्वीगी वाहनांना पासेस दिले जाणार आहेत. नागरिकांच्या अन्नाचा प्रश्न मोठा असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी ही माहिती दिली आहे.


AM News Developed by Kalavati Technologies