अशोक चव्हाण 'स्पीक अप इंडिया' मोहिमेत सहभागी, रुग्णालयातून व्हिडीओ केला शेअर

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव बघता कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, नेते राहुल गांधी तसेच प्रियंका गांधी वढेरा यांनी ‘स्पीक अप इंडिया’मोहिम हाती घेतली आहे.

मुंबई | देशाभरासह राज्यातील कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव बघता कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, नेते राहुल गांधी तसेच प्रियंका गांधी वढेरा यांनी ‘स्पीक अप इंडिया’मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेला राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ  अशोक चव्हाण यांनीही सहभाग घेऊन पाठिंबा दिला आहे. देशवासियांचा आवाज बुलंद करण्याच्या दृष्टीकोनातून मी देखील मुंबईच्या एका रुग्णालयातून कोरोनाशी लढा देत असताना पाठिंबा देत या मोहिमेमध्ये सहभागी होत असल्याचे श्री. चव्हाण यांनी व्हिडिओद्वारे जाहीर केले आहे. अशोक चव्हाण यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, केंद्राकडून भरीव मदत नसल्याने सर्वसामान्यांमध्ये नाराजीचं, निराशेचं वातावरण आहे. त्यांना आधार देण्यासाठी, देशाची अर्थव्यवस्था लवकरात लवकर रूळावर आणण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी काही सूचना मांडल्या आहेत. पुढे बोलतांना चव्हाण यांनी म्हंटल आहे. की मला केंद्र सरकारला जाणीव व विनंती करून द्यायची आहे की कोरोनाचा फटका सर्वसामान्य, शेतकरी, गरिब, आणि मजूरांना बसला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी काँग्रेस पक्षाने सुचवलेल्या उपाययोजनांमध्ये मी सहभाग नोंदवत आAM News Developed by Kalavati Technologies