परभणी | उष्माघातामुळे एका तरूणासह वृद्धाचा मृत्यू

दोघांच्याही आकस्मिक निधनाने परिवारात शोककळा पसरली आहे

परभणी | परभणी तालुक्यातील झरी येथे उष्माघातामुळे एका तरूणाचा व एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली आहे. लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमीवर हॉटेल व्यवसाय पूर्णतः बंद असल्याने माणिकराव वैद्य सकाळी शेतावर जावून पर्‍हाट्या वेचण्याचे काम सुरू असतांना त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ते गावी परतले. घरी आल्यावर अचानक त्यांना चक्कर आली त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तर झरी येथीलच वयोवृद्ध बाबुराव बमरोळे (वय 85) हे आपल्या चार फुटाच्या पत्र्याच्या घरात रहात होते. तापमानाचा पारा वाढल्याने त्यांनाही अस्वस्थ वाटू लागले यातच त्यांचे निधन झाले आहे. या दोघांच्याही आकस्मिक निधनाने परिवारात शोककळा पसरली होती.

परभणी जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून उष्णतेचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. पारा 44.5 अंशावर जावून पोहचला आहे. बुधवारीही तापमान वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान सध्या लॉकडावून असल्याने दुपारी 2 वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तु खरेदीसाठी सुट दिली आहे. मात्र 11 नंतर सर्वच भागातील रस्त्यावर शुकशुकाट जाणवत आहे. सायंकाळी उशीरापर्यंत उन्हाचे चटके बसत आहेत.AM News Developed by Kalavati Technologies