परभणीत कोरोना बाधितांची संख्या पोहेचली, 158 वर

आणखी 7 रुग्णांची भर, 101 रुग्ण उपचारानंतर घरी, सध्या 53 जणांवर उपचार सुरू

परभणी । परभणी जिल्ह्यात आठवडाभरा पासून रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मंगळवारी रात्री आलेल्या अहवालात आणखी सात रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्ह्याची रुग्णसंख्या आता 158 वर पोहोचली आहे. परभणी जिल्ह्यात जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून सातत्याने रुग्ण संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने प्रथम तीन दिवस व नंतर दोन दिवस संचारबंदी लागू केली. मात्र या काळात देखील रुग्ण संख्या ही झपाट्याने वाढताना दिसत आहे. मंगळवारी रात्री आलेल्या अहवालात आणखी सात रुग्ण बाधित असल्याचे समोर आले आहे.

यात परभणी शहरातील तीन, तर सेलू तालुक्यातील चार व्यक्तींचा समावेश आहे. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध प्रशासनातर्फे घेण्यात येत असून नागरिकांनी देखील रुग्ण संख्या वाढत असल्याने घराबाहेर पडू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. सध्या रुग्णालयात 53 जणांवर उपचार सुरू आहेत. तर 101 रुग्ण उपचारानंतर घरी गेले आहे.AM News Developed by Kalavati Technologies