परभणीत कोरोना चाचणीवर पुन्हा गंडातर, टेस्टींग कीट संपल्याने चाचणी केंद्र ठप्प

चाचणी केंद्रातील स्वॅब तपासणीचे कीट संपल्याने चाचणी केंद्र पुन्हा ठप्प झाले आहे.

परभणी | कोरोना विषाणुच्या पार्श्‍वभूमीवर परभणी जिल्हा रुग्णालयात दाखल होणार्‍या संशयित व्यक्तींच्या स्वॅबची चाचणी करण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात सुरू केलेल्या चाचणी केंद्रातील स्वॅब तपासणीचे कीट संपल्याने चाचणी केंद्र पुन्हा ठप्प झाले आहे.

परभणीत दररोज 30 स्वॅबची तपासणी करण्यात येत असल्याने काही तासातच अहवालही प्राप्त होवू लागले. यामुळे परभणीकरांनाही दिलासा मिळत गेला मात्र गेल्या आठ दिवसापासून चाचणीसाठी लागणार्‍या किट संपल्याने ही यंत्रणा पुन्हा ठप्प पडली आहे. परभणी असलेल्या मशिनसाठी लागणर्‍या किट मुंबईत उपलब्ध होवू शकतात त्यामुळे रूग्णालय प्रशासनाने संबंधीतांना संपर्क केला असला तरी सध्या ही यंत्रणा मात्र ठप्प झाली आहे. यामुळे आता परत नांदेड येथेच चाचणीसाठी स्वबॅ पाठवावे लागत आहेत.

दरम्यान परभणी जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापासून सातत्याने रूग्ण संख्येत वाढ होत असल्याने परभणीकरांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. नांदेड येथुन स्वबॅचा अहवाल येण्यास विलंब लागत असल्याने आणखी चिंतेत वाढ झाली आहे.AM News Developed by Kalavati Technologies