परभणीत मृत महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह, मुंबईतून सावंगी भांबळे येथे आली होती महिला 

सदर महिला 20 मे रोजी जिंतूर येथे दाखल झाल्याचे समोर आले.

परभणी | मुंबई येथून आपल्या मूळ गावी जिंतूर तालुक्यातील सावंगी भांबळे येथे आलेल्या एका 52 वर्षीय महिलेला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. मात्र सदर महिला 20 मे रोजी जिंतूर येथे दाखल झाल्याचे समोर आले. त्याच दिवशी उपचार सुरू असताना महिलेचा मृत्यू झाला होता. यानंतर या महिलेचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. याचा अहवाल शनिवारी रात्री उशिरा ने प्राप्त झाला आहे. तो पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. 

यामुळे सावंगी भांबळे हे गाव प्रशासनाने सील केलेय. प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. तहसीलदार सुरेश शेजुळ यांनी गावास भेट देऊन पाहणी केली. यानंतर या महिलेच्या संपर्कात आलेल्या 13 जणांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून परभणी जिल्ह्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच आता महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर परभणीकरायची चिंता अधिक वाढली आहे.AM News Developed by Kalavati Technologies