पंकजा मुंडे शनिवारी करणार पहिल्या 'लाईव्ह' पाणी परिषदेचे उदघाटन

दुष्काळमुक्त मराठवाडयासाठी मराठवाडा पाणी परिषदेचा उपक्रम

औरंगाबाद | मराठवाड्यात सातत्याने निर्माण होणा-या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मराठवाडा पाणी परिषदेच्या वतीने येत्या शनिवारी (ता.३०) पहिली 'लाईव्ह पाणी परिषद' आयोजित करण्यात आली आहे, परिषदेचे उदघाटन पंकजाताई मुंडे हया करणार असून मराठवाड्यातील पाणी प्रश्नांवर यावेळी त्या सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.

येत्या ३० तारखेला सकाळी ११ ते ४ या वेळेत ग्रामविकास भवन एन - २, सिडको औरंगाबाद येथून ही पाणी परिषद फेसबुकवरून 'थेट लाईव्ह' होणार आहे. त्यासाठी परिषदेने http://www.facebook.com/GramvikasSanstha1/फेसबुक लिंक व Gramvikas Sanstha Aurangabad ही यू ट्यूब जाहीर केली आहे.

यासाठी ही परिषद
-----------------------
सततच्या दुष्काळामुळे मराठवाडयाचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. मराठवाड्याच्या हिश्शाच्या उपलब्ध जलसंपत्तीचा पूर्ण क्षमतेने एकात्मिक पध्दतीने विकास व प्रभावी व्यवस्थापन केल्यास दुष्काळ निवारण शक्य आहे यासाठी आयोजित केलेली ही परिषद 'दुष्काळमुक्त मराठवाडयासाठी एकात्मिक जलनीती' या प्रमुख संकल्पनेवर आधारित आहे. परिषदेत मराठवाडयाचा पाणी प्रश्न व उपाय, दुष्काळमुक्त मराठवाडयासाठी आंतरखोरे पाणी परिवहन, पाण्याचा कार्यक्षम व उत्पादक वापर या विषयावर डाॅ. रमेश पांडव, शंकरराव नागरे, डाॅ. भगवानराव कापसे हे जलतज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. परिषदेचा समारोप आ. अंबादास दानवे करणार आहेत. वर उल्लेख केलेल्या फेसबुक लिंक आणि यू ट्यूब वरून सर्व जलप्रेमी नागरिकांनी पाणी परिषदेत सहभागी व्हावे असे आवाहन मराठवाडा पाणी परिषदेचे अध्यक्ष नरहरी शिवपुरे, उपाध्यक्ष मनोहर सरोदे, सचिव नवनाथ पवार यांनी केले आहे.AM News Developed by Kalavati Technologies