राम मंदिराच्या भूमीपूजनाचा मुहूर्त ठरवणाऱ्या पंडितांना जीवे मारण्याची धमकी..

मुहूर्त मागे घेण्यासाठी बेळगावातील पंडित एन.आर. विजयेंद्र शर्मा यांनी जीवे मारण्याची धमकी

बेळगाव । अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद प्रकरणावर सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंदिराचे भूमिपूजन करणार आहेत. हा दिवस राम मंदिर आंदोलनाची समाप्ती करणाराही मानला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 5 ऑगस्टला अयोध्येत भूमिपूजन होईल. त्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात येणाऱ्या सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे. अयोध्येतील राम मंदिराचा भूमीपूजनाचा मुहूर्त काढलेल्या बेळगावातील पंडितास जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.

कार्यक्रमाचा शुभमुहूर्त बेळगाव शहरातील पंडित एन.आर. विजयेंद्र शर्मा यांनी काढला आहे. रेल्वे ओव्हर ब्रिज शेजारी जक्कीन होंडनजीकच्या राघवेंद्र स्वामी नववृंदावन आश्रमाच्या विद्या विहार विद्यालयाचे कुलपती पंडित एन.आर. विजयेंद्र शर्मा यांनी उत्तर प्रदेशातील अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा येत्या 5 ऑगस्टचा शुभ मुहूर्त काढून दिला होता. भूमिपूजन कार्यक्रमाचा शुभारंभ धनिष्ठा नक्षत्रावर होणार असून, कार्यक्रमाची सांगता शतभिषा मुहूर्तावर होणार आहे. त्यांना जीवे मारण्याची धमकीचा फोन आला आहे.

या संदर्भात टिळकवाडी पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. देशाच्या विविध भागातुन त्यांना फोन करून राम मंदिराच्या भूमीपूजनाचा काढलेला मुहूर्त मागे घ्या अशी धमकी देण्यात आली आहे. गेल्या चार दिवसात पंडित शर्मा यांना देशाच्या विविध भागातून 50 हुन अधिक फोन कॉल्स आले आहेत. मुहूर्त मागे घ्या अन्यथा तुम्हाला जीवे मारू असेही धमकावण्यात आले आहे. या संदर्भात बेळगाव पोलिसांनी शर्मा यांना पोलीस संरक्षण दिले आहे.

कोरोना साथीच्या काळात होत असलेल्या भूमिपूजनासाठी विशेष तयारी केली जात आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनाची तयारी अगदी जोरात सुरू आहे. चांदीची वीट रचून मंदिराची पायाभरणी करण्यात येईल. 5 ऑगस्ट 2020 रोजी दुपारी 12 वाजून 15 मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. या उत्तम मुहूर्त असून, या वेळी अनेक चांगले योग जुळून येत आहे. राम मंदिराचे भूमिपूजन अभिजित मुहूर्तावर होणार आहे. या भूमिपूजन कार्यक्रमासाठी काशी येथील महंतांना निमंत्रण देण्यात आले आहे.

राम मंदिराचे विश्वस्त राष्ट्रसंत स्वामी गोविंदगिरी महाराज यांनी पंडित शर्मा यांच्यांशी संपर्क साधला होता. तसेच राम मंदिर उभारणीच्या कामाचा प्रारंभ करण्यासाठी एक शुभमुहूर्त काढून देण्याची विनंती केली होती. त्यानुसार 29 जुलै (सकाळी 9 नंतर), 31 जुलै (सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत), 3 ऑगस्ट (सकाळी 10 नंतर) आणि 5 ऑगस्ट रोजी संपूर्ण दिवसभर मंदिराचे भूमिपूजनाचा शुभमुहूर्त असल्याचे कळविले होते. स्वतः तसे पत्र लिहून राम मंदिराच्या विश्वस्तांना गेल्या 15 जून रोजी पाठविले होते, असे पंडित विजयेंद्र यांनी सांगितले होते.AM News Developed by Kalavati Technologies