कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पंढरपूर पोलीस ॲक्शन मोडवर, नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई

संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर पंढरपूर पोलिसांनी आजपासून कारवाईला सुरुवात केली.

पंढरपूर | कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नव्याने निर्गमित केलेल्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पंढरपूर पोलिसांनी आजपासून कारवाईला सुरुवात केली. त्यामुळं संचारबंदीत प्रशासनाच्या नियमांना केराची टोपली दाखवणाऱ्या नागरिकांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस आता रस्त्यावर उतरत पुन्हा ॲक्शन मोड मध्ये आले आहेत. सोलापूर शहर आणि ग्रामीण भागांमध्ये सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. पंढरपूर मध्ये देखील 22 रुग्ण सापडले. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पाच जुलै रोजी नवे आदेश काढले आहेत.

नवीन आदेशानुसार मास्क न वापरणे, दुचाकीवर दोघांपेक्षा जास्त लोकांनी प्रवास करणे, तीन चाकी वाहनांमध्ये ठिकाणी पेक्षा जास्त लोकांनी प्रवास करणे, तसेच चारचाकी वाहनांमध्ये देखील तीनपेक्षा जास्त व्यक्तीने प्रवास केल्यास त्यांच्यावर पाचशे ते साडेसातशे रुपये पर्यंत दंडाची तरतूद या आदेशात करण्यात आलीय.  तसेच निर्धारित वेळेनंतर दुकान चालू ठेवल्यास आणि दुकानांमध्ये 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेले मालक किंवा नौकर कामावर आढळल्यास या अशा दुकानांवर कारवाई करण्यात येणार आहे.

याचप्रमाणे होम क्वारंटाईन योग्य रीतीने न पाळणे सार्वजनिक ठिकाणी थुंकणे फिजिकल डिस्टसिंगचे पालन न करणे सार्वजनिक ठिकाणी दारू पान-तंबाखू याचे सेवन केल्यास देखील दंडात्मक कारवाईची तरतूद या आदेशांमध्ये करण्यात आली आहे. आज पंढरपूर पोलिसांनी सावरकर चौक या ठिकाणी वाहनांची तपासणी दुकानांची तपासणी मास्क न वापरणाऱ्या वर कारवाईला सुरवात केलीय.AM News Developed by Kalavati Technologies