श्री विठ्ठल मंदिर दर्शनाकरीता खुले करण्यासाठी औसेकर महाराज घालणार मुख्यमंत्र्यांना साकडे

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या पाच महिन्यांपासून विठ्ठल मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद आहे.

पंढरपूर | कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या पाच महिन्यांपासून विठ्ठल मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद आहे. मंदिर पुन्हा दर्शनासाठी खुले करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना साकडे घालणार आहे, अशी माहिती विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

कोरोनाचा संसर्ग रोखण्याबरोबरच सोशल डिस्टन्स ठेवून देशात व राज्यात बाजारपेठांसह अनेक कंपन्या व आस्थापने सुरू करण्यात आली आहेत. याबरोबरच धार्मिक देवस्थाने देखील सुरू झाली आहेत. यामध्ये श्री बालाजी मंदिरानंतर आता वैष्णवी देवीचे मंदिरही दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. याच धर्तीवर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेले विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यासाठी राज्य सरकारकडे आपण लवकरच पाठपुरावा करणार आहोत. सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून भाविकांना दर्शन देणे आता शक्‍य आहे.

एका मिनिटाला एका व्यक्तीला दर्शनासाठी सोडले तरी दिवसभरात किमान एक हजार भाविकांना विठ्ठल- रुक्‍मिणीचे दर्शन देता येणार आहे. मागील 17 मार्चपासून विठ्ठल मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. गेल्या पाच महिन्यांमध्ये आषाढी, चैत्री, श्रावणीसह महिन्याच्या यात्राही रद्द करण्यात आल्या आहेत. यात्रा रद्द केल्यामुळे पंढरपूरच्या अर्थकारणावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. शिवाय मंदिर समितीचे देखील कोट्यवधींचे उत्पन्न बुडाले आहे. कोरोनाच्या संकट काळात सेवा म्हणून मंदिर समितीने अन्नदानाबरोबरच इतर सामाजिक उपक्रम देखील राबवले आहेत. कोरोनाच्या संकट काळात राज्य सरकारला मंदिर समितीने एक कोटी रुपयांची मदत देखील दिली असल्याचे गहिनीनाथ औसेकर महाराज यांनी सांगितले.AM News Developed by Kalavati Technologies

A PHP Error was encountered

Severity: Core Warning

Message: PHP Startup: Unable to load dynamic library 'ftp.so' (tried: /RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so (/RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so: cannot open shared object file: No such file or directory), /RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so.so (/RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so.so: cannot open shared object file: No such file or directory))

Filename: Unknown

Line Number: 0

Backtrace: