अमरावती जिल्हात तीन तालुक्यात पंचायत समिती निवडणूक

मतदानाला शांततेत सुरुवात

अमरावती । अमरावती जिल्ह्यातील तिवसा, चांदुर रेल्वे व धामणगाव रेल्वे या तीन तालुक्यातील पंचायत समितीची आज सार्वत्रिक निवडणूक असून आज रविवारी मतदान शांतपणे सुरू आहे. या तिन्ही पंचायत समितीत एकूण 74उमेदवार निवडणूक रिंगणात असून 20 जागेसाठी हे मतदान पार पडले यात 245174 मतदार आपला मतदारानाचा हक्क बजवणार आहेत. मात्र सकाळी 11.30 वाजेपर्यंत तिन्ही तालुक्यात केवळ 18 टक्के मतदान झाले होते.

धामणगाव रेल्वे पंचायत समितीसाठी एकूण 8 जागेसाठी 27 उमेदवार निवडणूक रिंगणात यात 93 हजार 869 मतदार आहे. तिवसा पंचायत समितीत 6 जागा उमेदवार 28 रिंगणात आहे, तर मतदार 82069 मतदार मतदार आपला मतदानाचा हक्क बजावनार आहे तर चांदुर रेल्वे पंचायत समितीसाठी सहा जागेसाठी 19 उमेदवार रिंगणात आहे 69236 मतदार आहे उद्या सोमवारी मतमोजणी अंती निकाल जाहीर होणार आहे.AM News Developed by Kalavati Technologies