शेतकऱ्याची कन्या पल्लवी काळे नौदलाच्या परीक्षेत देशात दुसरी; गरिबीवर मात करत संघर्ष पूर्णत्वास

शेतकरी दांम्पत्याची कन्या पल्लवी ही नौदल परीक्षेत देशात दुसरी

माढा । माढा तालुक्यातील भोगेवाडीच्या सुनील व संतोषी काळे या शेतकरी दांम्पत्याची कन्या पल्लवी ही नौदल परीक्षेत देशात दुसरी आली आहे. भोगेवाडी सारख्या खेड्यातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या पल्लवीची भारतीय नौदल कोस्ट गार्ड असिस्टंट कमाडन्ट पदासाठी निवड झाली. माढा तालुक्यातील भोगेवाडीच्या सुनील व संतोषी काळे या शेतकरी दांम्पत्याची कन्या पल्लवी ही नौदल परीक्षेत देशात दुसरी आली आहे.

भोगेवाडी सारख्या खेड्यातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या पल्लवीची भारतीय नौदल कोस्ट गार्ड असिस्टंट कमाडन्ट पदासाठी निवड झाली आहे. भोगेवाडी गावात भारतीय सैन्य दलात अनेक तरुण सीमेवर मातृभूमीचे रक्षण करत आहेत. त्यातच आता पल्लवीच्या रूपाने गावाला नौदलातील पहिली महिला अधिकारी मिळणार आहे. केंद्रीय स्टाफ सिलेक्शन च्या घेण्यात आलेल्या परीक्षेत तिने दुसरा क्रमांक पटकावला आहे.

पल्लवीचे पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण भोगेवाडी जि.प.प्राथमिक शाळेत झाले आहे. पाचवी ते बारावीचे शिक्षण राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा;तर, मेकॅनिकल इंजिनियरिंगची पदवी सिंहगड इन्स्टिट्युट येथे पूर्ण केली आहे. ती पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होती. या यशानंतर बोलताना, प्रत्यकाने आई वडिलांच्या कष्टांची जाण बाळगून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणे आवश्यक असल्याचे तीने सांगितले. ध्येय सत्यात उतरवण्यासाठी अभ्यासात सातत्य, सकारात्मक विचार आवश्यक असल्याचे पल्लवीने म्हटले.AM News Developed by Kalavati Technologies