पालघरमधील वाडा येथे शाळेच्या बसचा अपघात, 57 विद्यार्थी जखमी

सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

पालघर | वाडा ते शहापूर तालुक्यातील पिवळी गावापर्यंत महाराष्ट्र राज्य महामंडळाच्या वाडा आगाराची बससेवा सुरू आहे. पिवळीहून वाड्याच्या दिशेने भरधाव वेगाने येत असताना जांभूळपाडा नजीक गतीरोधकावर आदळल्याने चालकाचा ताबा सुटून बसचा अपघात झाला. या अपघातात सुमारे पन्नास विद्यार्थी जखमी झाले. यापैकी दोन गंभीर जखमींना अधिक उपचारासाठी ठाणे येथील सिव्हिल हॉस्पिटल मध्ये हलवण्यात आले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

वाडा ग्रामीण रुग्णालयात एकूण 57 जखमी प्रवासी दाखल करण्यात आले होते. यामधील जवळपास 40 जखमींना आवश्यक उपचार करून घरी सोडण्यात आले असून दोन गंभीर जखमींना ठाणे सिव्हील हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले आहे. पाच जखमी प्रवासी वाड्यातील खाजगी रुग्णालयात दाखल झाले असून त्यांचीही चौकशी करून त्यांना देखील आवश्यक मदत पुरवली जात आहे. अपघातात जखमी झालेल्यांना  ₹1000 व किरकोळ जखमींना ₹500 तातडीची आर्थिक मदत म्हणून देण्यात आले असून यानंतर त्यांच्यावर होणाऱ्या उपचारांचा संपुर्ण खर्च तसेच योग्य ती नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी वाडा तालुका प्रवासी संघटने मार्फत पाठपुरावा व सहकार्य केले जाईल.


AM News Developed by Kalavati Technologies