Palghar Corona : पालघरमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येने गाठला 10 हजारांचा आकडा

पालघरमध्ये आज कोरोनाचे 431 नवे रुग्ण, एकूण रुग्णसंख्या पोहोचली 10 हजार 164 वर

पालघर । पालघर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत असून, कोरोना रुग्णांच्या संख्येने तब्बल 10 हजारांचा आकडा पार केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेची चिंता अधिक वाढली आहे. आज दिवसभरात पालघर जिल्ह्यामध्ये कोरोनाचे 431 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 7 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आज नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये 58 रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत.

जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता 10 हजार 164 वर पोहचला आहे. तर आजवर 181 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान जिल्ह्याच्या विविध रुग्णालयांमध्ये 2 हजार 839 कोरोनाबाधित रुग्णांवर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. तर 7 हजार 137 कोरोनाबाधित रुग्ण वैद्यकीय उपचारानंतर बरे झाले आहेत. तर 1 हजार 149 कोरोना संशयीतांचे तपासणी अहवाल प्रतिक्षेत आहेत.AM News Developed by Kalavati Technologies