पाचोड |आवक वाढल्याने मोसंबीचे दर घसरले, शेतकरी चिंताग्रस्त

दुष्काळामध्ये शेतकऱ्यांनी अथक प्रयत्न करून मोसंबीच्या बागा जिवंत ठेवल्या होत्या

पैठण |  तालुक्यातील पाचोड मोसंबी मार्केट मध्ये आवक वाढल्याने मोसंबीचे दर घसरले मोठ्या प्रमाणात घसरले आहे. मोसंबीच्या प्रति टनला सहा ते दहा हजारापर्यंत मिळत भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. तालुक्यात सतत तीन वर्षे दुष्काळ पडलेला होता .  या दुष्काळामध्ये शेतकऱ्यांनी अथक प्रयत्न करून मोसंबीच्या बागा जिवंत ठेवल्या होत्या.  या पुढच्या वर्षी मोसंबीला चांगला भाव मिळेल आशेवर शेतकऱ्यांनी विकतचे पाणी घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या बागांचे संरक्षण केले होते. मात्र या वर्षी  मोसंबीला अवघा सहा हजारापासून ते दहा हजारापर्यंत  भाव मिळत असल्याने  शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे.

मराठवाड्यामध्ये पाचोड परिसर मोसंबीचे आगार म्हणून ओळखला जातो. सतत पडत असलेल्या दुष्काळाने या आगाराला ग्रहण लागले आहे. त्यातच दुष्काळाने मागील दोन वर्षांमध्ये 50 ते 60 टक्के बागा जळून खाक झाल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांनी विकतचे पाणी घेऊन आपल्या बागांची जोपासना केली त्या शेतकऱ्यांना यावर्षी पश्चतापाची वेळ येत आहे. मोसंबीला बाजारात योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्गात नाराजीचा सुर उमटला आहे.AM News Developed by Kalavati Technologies