ओप्पो तर्फे तंत्रज्ञान उत्साहींसाठी सामुदायिक व्यासपीठ

नवीन सादरीकरणांबाबत अपडेट्स, तंत्रज्ञानासंदर्भात बातम्या, विक्रीबाबत अॅलर्ट्स, विशेष ऑफर्स आणि खास कार्यक्रमांसाठी गेटवे असलेले हे व्यासपीठ स्पेशल गेटवेज, कंटेण्ट्स, पुरस्कार अशी माहिती देखील सांगेल.

मुंबई |  ओप्पो या आघाडीच्या जागतिक स्मार्ट डिव्हाईस ब्रॅण्डने तंत्रज्ञान उत्साहींसोबत संबंध प्रस्थापित करत त्यांना सामावून घेण्यासाठी आणि विविध टचपॉईंट्सना सक्षम करण्यासाठी त्यांच्या सामुदायिक व्यासपीठाच्या सादरीकरणाची घोषणा केली. तंत्रज्ञानाचा वापर करत लोकांना सक्षम करण्याच्या ब्रॅण्डच्या प्रयत्नांशी बांधील राहते हे परस्परसंवादी व्यासपीठ वापरकर्त्यांना सहयोग, शेअर व माहिती मिळवण्यामध्ये मदत करण्यासोबत सर्व उत्पादने व सेवांबाबत अद्यायावत माहिती देईल. नवीन सादरीकरणांबाबत अपडेट्स, तंत्रज्ञानासंदर्भात बातम्या, विक्रीबाबत अॅलर्ट्स, विशेष ऑफर्स आणि खास कार्यक्रमांसाठी गेटवे असलेले हे व्यासपीठ स्पेशल गेटवेज, कंटेण्ट्स, पुरस्कार अशी माहिती देखील सांगेल. तंत्रज्ञान चर्चा, सर्जनशील उपक्रम, एएमए सत्रे ते उत्पादन अभिइप्रायापर्यंत ओप्पो समुदाय विविध कार्यक्रमांचे आयोजन करतील. सर्व वापरकर्ते समुदायाचा भाग होण्यासाठी आणि आकर्षक ओप्पो गुडीज जिंकण्याकरिता सुरु असलेल्या ओप्पो ह्युमन स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी नोंदणी करु शकणार आहेत.AM News Developed by Kalavati Technologies