आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेला मुख्यमंत्र्यांसह 40 व्यक्तींनाच प्रवेश

पूजेसाठी देवाच्या गाभाऱ्यात असणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.

पंढरपूर | पंढरपूरचा आषाढी यात्रेचा सोहळा 1 जुलै रोजी साजरा होत आहे. श्री विठ्ठलाची महापूजा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासोबत फक्त 40 व्यक्तींनाचा प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली. तसेच दशमीला मंदिर पूर्णपणे सॅनिटाईज केले जाणार आहे.

पूजेसाठी देवाच्या गाभाऱ्यात असणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी दक्षता म्हणून 17 मार्चपासून श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. आषाढी यात्रेच्या काळात देखील कोणाही भाविकास मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. यंदा वारकऱ्यांनी यात्रेसाठी पंढरपूरला येऊ नये अशा प्रकारचे आवाहन करण्यात आलेले आहे. त्यामुळे सर्व वारकरी मंडळींना तसेच भाविकांनी ऑनलाईन दर्शन घ्यावे असे आवाहन विठ्ठल जोशी यांनी केलं आहे.AM News Developed by Kalavati Technologies