महिला कामगारांच्या पिकअपला अपघात, एका महिलेचा मृत्यू, तर 7 गंभीर जखमी

महिला कामगारांना वाहून नेणाऱ्या पिकअप गाडीचा भीषण अपघात

पालघर | डहाणू चारोटी मार्गावर वाडीत काम करणाऱ्या महिला कामगारांना वाहून नेणाऱ्या पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य 7 महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. रेणूका लहांगे असे मृत महिलेचे नाव आहे. या सर्व महिला विक्रमगड तालुक्यातील तलावली येथील रहिवासी असून डहाणू तालुक्यातील वाढणान येथे मिरचीच्या वाडीत कामाला आल्या होत्या. कामावरून परतत असताना रानशेत परिसरात हा अपघात घडला आहे. दरम्यान जखमींना कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले असून पाच महिलांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहेत.AM News Developed by Kalavati Technologies