मुंबईच्या विद्याविहार परिसरात दोन गटात तुफान हाणामारी, एकाचा मृत्यु तर सहा जण जखमी

एकाचा मृत्यु तर सहा जण जखमी

मुंबई |  विद्याविहार परिसरात गाडीचा हॉर्न वाजवण्यावरून दोन गटात झालेल्या तुफान हाणामारीत 6 जण गंभीर जखमी झाले असून एकाचा मृत्यु झाला आहे. संदीप बलसिंग परचा (28), बलसिंग आसाराम परचा (70), कृष्णा बलसिंग परचा (60), मनोहर चवरीया (60), मनोज मनोहर चवरीया (30), पूजा मनोहर चवरीया (32) आणि दीपक मनोहर चवरीया 27) असे हाणामारीत जखमी झालेल्यांची नावे आहेत.

हाणामारी करणारे सर्व लोक एकाच समाजाचे असून कीरकोळ कारणातून हा वाद झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.AM News Developed by Kalavati Technologies