धक्कादायक! विजेचा शॉक लागल्याने आईसह मुलाचा जागीच मृत्यू

घरावरील पत्रात करंट उतरल्याने आईसह एका मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दुसरा मुलगा गंभीर जखमी झाला आहे

पूर्णा । घराच्या पत्रात विजेचा प्रवाह उतरून झालेल्या दुर्दैवी घटनेत आईसह वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी तालुक्यातील कातनेश्वर येथे घडली. सदरील घटनेत दुसरा एक मुलगा जखमी झाला आहे. प्राथमिक माहितीवरून कातनेश्वर येथील जिजाबाई बबन चव्हाण (वय 45) या सोमवारी दुपारी घरात काम करीत असताना, त्यांच्या घरावर लोखंडी पत्रात विजेचा प्रवाह उतरला होता. काही काम करीत असताना त्यांचा स्पर्श त्या पत्रांना झाला ज्यामुळे पत्रातील प्रवाह हा त्यांच्या शरीरात उतरला.

आईला काहीतरी झाले हे लक्ष्यात येताच मदतीसाठी जवळ गेलेला मुलगा आकाश बबन चव्हाण (वय 25) यालासुद्धा करंट लागल्याने, वडील बबन चव्हाण यांनी आरडाओरड केल्याने व परिसरातील नागरिकांनी जाऊन डीपीवरील वीजप्रवाह बंद केला. त्यांना तात्काळ परभणी येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु या दुर्घटनेत आई व मूलाचा मृत्यू झाला असून, दुसरा मुलगा विकास हा जखमी झाला आहे. ह्या घटनेने पूर्णासह आजूबाजूच्या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.AM News Developed by Kalavati Technologies