धोनी रन आउट... अन् टीम इंडिया विश्वचषक स्पर्धेतून आऊट, आजच्या दिवशी तुटली होती लाखो क्रिकेटप्रेमींची मने

मॅनचेस्टर येथे खेळल्या गेलेल्या वर्ल्ड कप 2019 च्या सेमी फायनल सामन्यात न्यूझीलंडने विराट ब्रिगेडला 18 धावांनी पराभूत केले होते.

डेस्क स्पेशल | एका वर्षापुर्वी आजच्या दिवशी वर्ल्ड कप जिंकण्याची आस धरून बसलेल्या भारतीय चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. जेव्हा या दिवशी (10 जुलै) टीम इंडियाला उपांत्य पुर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता. मॅनचेस्टर येथे खेळल्या गेलेल्या वर्ल्ड कप 2019 च्या सेमी फायनल सामन्यात न्यूझीलंडने विराट ब्रिगेडला 18 धावांनी पराभूत केले होते. या पराभवासह तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचे भारताचे स्वप्नही भंगले होते.

नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या संघाने 50 षटकांत 8 गडी गमावून 239 धावा केल्या. 240 धावांचे छोटे लक्ष्यही टीम इंडियासाठी भारी होते. 49.3 षटकांत ती 221 धावांवर संपुष्टात आली. भारतीय संघाने अवघ्या 92 धावांवर सहा फलंदाजांना गमावले होते. अशातच टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा 77 धावा आणि महेंद्रसिंग धोनी 50 धावा यांनी सातव्या विकेटसाठी 116 धावांची भागीदारी करुन तमाम भारतीयांच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या होत्या.

एकवेळेस बॅकफूटवर येणारी टीम इंडिया सामन्यावर आपली पकड मजबूत करत आहे. असं वाटत असतांना न्यूझिलंडचा गोलंदाज ट्रेंट बोल्टने सामन्याचे चित्र पालटले त्याने रविद्र जडेजाला कर्णधार केन विल्यमसनच्या हाती झेलबाद केले. त्यानंतर माजी कर्णधार धोनी हा भारताच्या विजयाची शेवटची आशा होती. अखेरच्या दोन षटकांत भारताला 31 धावांची गरज होती. पहिल्याच चेंडूवर धोनीने षटकार ठोकला आणि दुसऱ्या चेंडूवर दोन धावा घेत असतांना मार्टिन गुप्टिलने केलेल्या थ्रो थेट स्टंपला लागला आणि भारताच्या आशेची घोर निराशा झाली. आणि इथेच टीम इंडियाच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा संपल्या.

धोनीने केलेली 50 धावांची खेळी भारताला विजय मिळून देऊ शकली नाही. त्यानंतर लॉकी फर्ग्युसनने भुवनेश्वर कुमार (0) आणि जिमी नीशमने युजवेंद्र चहल (5) यांना झटपट बाद करून उपांत्य फेरीत धडक मारली. भारताकडून रोहित शर्मा (1) केएल राहुल (1)  कर्णधार विराट कोहलीची (1) दिनेश कार्तिक 6 धावा हे सपशेल अपयशी ठरले. AM News Developed by Kalavati Technologies