आरएसएस प्रमुखांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी म्हणाले- 'भारत हा हिंदू राष्ट्र कधीच नव्हता, कधीच नाही आणि कधीच नसेल'

भागवतांनी आम्हाला परदेशी मुस्लिमांशी कितीही जोडले तरी यामुळे आमची भारतीयता कमी होणार नाही

नवी दिल्ली । जगात सर्वांधिक सुखी मुसलमान भारतात मिळतील या सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी संताप व्यक्त केला आहे. ओवैसी यांनी ट्विट करत सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर टीका केली आहे. मोहन भागवत यांनी भारत हिंदू राष्ट्र असल्याचे म्हटले होते. त्यावर ओवैसी यांनी टीका करत भारत कधीच हिंदू राष्ट्र नव्हता आणि नाही राहणार', असे म्हटले आहे. 

ओवेसी यांनी पुढे असे देखील म्हटले आहे की, 'भागवतांनी आम्हाला परदेशी मुस्लिमांशी कितीही जोडले तरी यामुळे आमची भारतीयता कमी होणार नाही. हिंदू राष्ट्रला हिंदू वर्चस्व म्हणून संबोधणे हे आम्हाला कधीच मान्य होणार नाही.' असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

आरएसएस प्रमुख म्हणाले की जगातील सर्वात आनंदी मुस्लिम भारतात भेटतील कारण आम्ही हिंदू आहोत. भारत हा एकमेव असा देश आहे जेथे यहूद्यांना आश्रय मिळाला. झोरोस्टेरियन आणि मूळ धर्माची उपासना केवळ भारत देशातच सुरक्षित आहे. त्या वेळी ओडिशा येथे झालेल्या अखिल भारतीय कार्यकारिणीच्या बैठकीत भाग घेण्यासाठी संघाचे प्रमुख भागवत आले होते, संघाच्या प्रमुखांना लक्ष्य करून विरोधी पक्षांनी हे प्रकरण पेटवण्याचा प्रयत्न केला आहे.AM News Developed by Kalavati Technologies