कोल्हापुरात कोरोनाच्या भीतीने वृद्ध महिलेची आत्महत्या

त्यावेळी त्यांना कोरोना विषयी माहिती मिळाली

कोल्हापूर | कोरोनाच्या भीतीने वृद्ध महिलेने पंचगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. गुरुवारी कोल्हापूर जिल्ह्यतल्या करवीर तालुक्यातील हनुमान नगर ते बावड्या च्या हद्दीत नदी किनाऱ्यावरती त्यांचा मृतदेह आढळला आहे. 68 वर्षीय असणाऱ्या मालुबाई आकाराम आवळे असं आत्महत्या केलेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे.

मालूबाई आवळे या मुलगा बाळू, सून आणि नातवंडे यांच्यासोबत शिरोली औद्योगिक वसाहत मधील इंडस्ट्रीज येथे राहत होत्या. मुलगा बाळू हा एका कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून काम करतोय. मालुबाई नातवंडांना कारखाना का बंद आहे ? त्याची विचारणा करत होत्या. त्यावेळी त्यांना कोरोना विषयी माहिती मिळाली. हा आजार वयोवृद्ध व्यक्तींना होतो आणि त्यांच्या मार्फत तो इतरांना होतो असा समज त्यांनी करून घेतला. गुरुवारी त्या घरातून बाहेर पडल्या. आणि त्यांच्या कुटुंबीयांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची फिर्याद देखील देण्यात आली. दरम्यान नदीपात्रात महिलेचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि तपासात त्या मालुबाई असल्याचं सिद्ध झालं.AM News Developed by Kalavati Technologies