बसच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

मृतक  ईद मिलनसाठी अचलपुरला आले होते

अचलपुर |  शहरातील गांधी पुल भागात एसटी महामंडळाच्या बसखाली येवुन एका वृद्ध इसमाचा जागीच मृत्यु झाला. मृतकाचे नाव नुर खान वय 7० वर्ष असे आहे.

परतवाडा आगाराची बस (क्र.MH.4O N9967) ही परतवाडा-काकडा अचलपुर मार्गे नियमीत जात असते. आज सकाळी गांधीपुल स्टॉपवर बस परतवत असताना अनावधाने वृद्ध इसम बसच्या पुढल्या चाका खाली येवुन जागीच गतप्राण झाला. एसटीचे चाक पोटावरूण गेल्याने पोटाच्या चिंधळ्या उडाल्या होत्या. मृतक  नातेवाईक सैयद सुभान, रायपुरा येथे ईद मिलनसाठी परतवाड़ हुन अचलपुरला आले होते. सकाळी 7:30 च्या दरम्यान गांधी पुल वरूण परतवाडा जाण्यासाठी आले होते. घटना घडताच बसचा ड्रायव्हर पेढेकर, व वाहक दोघे फरार झाले होते. प्रत्यक्ष दर्शी सैयद साबीरने इतर लोकांच्या मदतीने नुर यांना रुग्णालयात नेले असता डॉ. त्यांना मृत घोषीत केले. एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी मृतकाच्या नातेवाईकांची भेट घेवुन मदत देण्याचे आश्वाशन दिले. सरमसपुरा पोलीस स्टेशनचे पोलीस घटनेचे चौकशी करत आहे.AM News Developed by Kalavati Technologies