चंद्रपूरमध्ये नर्स पॉझिटीव्ह, बाधितांची संख्या 13 वर

मुंबईतून आलेली नर्स पॉझिटीव्ह

चंद्रपूर : जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 13 झाली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या वृत्तानुसार रात्री उशिरा नागपूर येथून प्राप्त अहवालामध्ये आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. हा नवा रुग्ण चंद्रपूर शहरातील बाबूपेठ परिसरातील आहे. मुंबई येथील एका खासगी इन्स्टिट्यूटमध्ये ही युवती स्टाफ नर्स म्हणून काम करत होती. यापूर्वी 22 दिवस मुंबईतील एका हॉटेलमध्ये ही युवती संस्थात्मक अलगीकरणात होती. १६ मे रोजी मुंबईवरून ही युवती चंद्रपूर येथे आली. तेव्हापासून होम कॉरेन्टाइन होती.

लक्षणे जाणवायला लागल्यावर 20 मे रोजी चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल झाली. 21 मे रोजी या युवतीच्या स्वॅबचा नमुना घेण्यात आला. काल रात्री उशिरा नागपूर येथून तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या युवतीच्या घरातील आई, वडील व बहीण या तिघांचे नमुने घेण्यात आले आहे. त्यांना देखील संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. या अहवालामुळे आता जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 13 झाली आहे.AM News Developed by Kalavati Technologies