मी पक्षावर नाराज आहे असा भ्रम कोणीही पसरवू नये, चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण

भाजपने अनेक ओबीसी नेत्यांना संधी दिली - चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई । राज्यात ओबीसी नेत्यांना डावलण्यात आले असल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री विनोद तावडे, चंद्रकांत बावनकुळे यांसारख्या अनुभवी नेत्यांना तिकीट डावलण्यात आले. तर ज्या ओबीसी नेत्यांना तिकीट देण्यात आले होते त्यांच्या पराभवालाही भाजपच कारणीभूत असल्याचा आरोपही एकनाथ खडसे यांनी केला आहे. तसेच पक्षाच्या भूमिकांवर पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चांनाही यावेळी त्यांनी दुजोरा दिला होता. तर, भाजपचे प्रवक्ते आशिष शेलार यांनी थोरात यांचा दावा फेटाळून लावत भाजप आमदार पक्ष सोडणार नाहीत. भीतीपोटी आमदार पक्ष सोडण्याच्या चर्चा या फक्त अफवाच आहेत. या चोराच्या उलट्या बोंबा असल्याचे शेलार यांनी सांगितले आहे.  यावर बोलताना भाजपमध्ये ओबीसी नेत्यांवर अन्याय होत नाही, भाजपने अनेक ओबीसी नेत्यांना संधी दिली आहे. पद दिले आहे. मी पक्षावर नाराज आहे असा भ्रम कोणी ही पसरवू नये असा खुलासा राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. खडसे वरिष्ठ नेते आहेत, त्यांच्या बद्दल मी बोलणार नाही. मात्र, प्रकाश शेंडगे यांनी तर भाजप मधील ओबीसी नेत्यांबद्दल बोलू नये. अस मत यावेळी बावनकुळेंनी मांडले.

दरम्यान, राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आता त्याचे हादरे भाजपला बसू लागले आहेत. भाजपने अनपेक्षितरित्या राज्यातील सत्ता गमवल्यानंतर आता पक्षात बरीच धुसफूस सुरु असल्याचं दिसून आलं आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी तर कालच आपली नाराजी थेट माध्यमांसमोर व्यक्त करुन देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. या सगळ्या घडामोडी सुरु असतानाच आता भाजपला आणि राज्यातील भाजपचे दिग्गज नेते फडणवीस यांना अतिशय मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.AM News Developed by Kalavati Technologies