मला आरक्षण मिळालं असतं तर मीसुद्धा 'बाबू' असतो - नितीन गडकरी

अखिल भारतीय माळी समाजाच्या महाविधेशन नागपूरात आयोजित करण्यात आले होते

नागपूर | आरक्षण मिळाल्यानेच विकास होतो असं नाही तर कर्तृत्व सुद्धा विकास घडवते. म्हणून आपण करतो त्या कामाला सुद्धा महत्व दिलं पाहिजे. बरं झालं आमच्या जातीला आरक्षण नाही, नाही तर मी कुठेतरी बाबू झालो असतो. असं वक्तव्य केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. अखिल भारतीय माळी समाजाच्या महाविधेशन नागपूरात आयोजित करण्यात आले होते यावेळी गडकरी बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य उपस्थित होते.

यावेळी बोलताना गडकरी यांनी सांगितले की, मी सगळ्याच समाजाच्या कार्यक्रमात जातो. प्रत्येक समाजात मागणी असते आम्हाला राजकारणात जागा मिळाली पाहिजे. मंत्री पद समाजाला मिळालं पाहिजे. समाजातला माणूस मंत्री झाला की त्याच्या हातून त्याच्या समाजाचा विकास होईलच असं नाही. त्याला सगळ्याच समाजाचा विचार करावा लागतो. जे शोषित, वंचित, दुर्बल आहेत अशांना आरक्षण मिळालेच पाहिजे. इंदिरा गांधी, जॉर्ज फर्नांडिज, सुषमा स्वराज किंवा वसुंधरा राजे सिंधीया यांनी अरक्षणाविना आपले कर्तृत्व सिद्ध केले असेही गडकरी यावेळी म्हणाले.

नितीन गडकरी पुढे बोलताना म्हणाले की, प्रयत्न केल्यास कुठलच कार्य अशक्य नाही त्यासाठी समाजातील जागृकांनी पुढाकार घेतला पाहिजे. मी 15 हजार ग्रामीण भागातील युवकांना रोजगार दिला. त्यात माझ्या समाजाचे 50 सुद्धा नाही. मी जाती धर्म मानत नाही प्रत्येकासाठी काम करतो. जे लोककर्तृत्वाने हरतात ते तिकीट मागण्यासाठी जातीचा आधार घेतात अशी टीका सुद्धा समाजाच्या नावावर तिकीट मागणाऱ्यांवर त्यांनी केली. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्री बाई फुले यांना भारतरत्न देण्याची समाजाची मागणी आहे. त्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचं सुद्धा गडकरी यांनी यावेळी बोलताना सांगितले.AM News Developed by Kalavati Technologies