निर्भया । सरन्यायाधीश बोबडेंनी सुनावणीतून घेतली माघार, पुनर्विचार याचिकेवर उद्या सुनावणी

निर्भया केस: सरन्यायाधीश बोबडेंनी घेतली माघार

नवी दिल्ली । सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणी दरम्यान, मुख्य न्यायाधीश एस.ए. बोबडे यांनी निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चार आरोपींपैकी अक्षय कुमार सिंग यांनी फाशीच्या शिक्षेचा पुनर्विचार करण्यासाठी दाखल केली आहे. दरम्यान, या याचिकेवरील सुनावणीसाठी नवे घटनापीठ बुधवारी सकाळीच स्थापन केले जाईल. तसेच सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या पुतण्याने निर्भयाच्या बाजूने युक्तिवाद केला असल्याने सरन्यायाधीश शरद बोबडे हे या सुनावणीपासून वेगळे झाले आहे. निर्भया बलात्कार प्रकरणातील सहा आरोपींपैकी चार आरोपींना फाशीची शिक्षा झाली होती. पैकी अक्षय ठाकूर या आरोपीने सर्वोच्च न्यायालयात दयेची याचिका दाखल केली आहे. दरम्यान या सुनावणीवेळी निर्भयाचे पालकसुद्धा न्यायालयात उपस्थित होते. दरम्यान, दोषीच्या वकिलाला युक्तिवादासाठी 30 मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. यावेळी दोषींच्या वकिलाने आपल्या अशिलाविरोधात कुठलाही पुरावा नसल्याचा दावा करत सगळा दोष प्रसारमाध्यमांच्या माथी मारला. प्रसारमाध्यमांनीच आपल्या अशिलाविरोधात अपप्रचार केला. असा आरोप त्यांनी केला.

डिसेंबर 2012 मध्ये निर्भया प्रकरण झाल्यानंतर सर्व आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. देशात प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. मात्र आरोपींना शिक्षा होऊनही त्याची अंमलबजावणी होत नाही त्यामुळे प्रचंड टीका होत आहे. हैदराबाद प्रकरणानंतर निर्भया प्रकरणातल्या आरोपींना केव्हाही फाशी होऊ शकते असंही बोललं जात होतं त्यामुळेच ही याचिका दाखल करण्यात आल्याचं बोललं जातं आहे.AM News Developed by Kalavati Technologies