हैदराबादेत पावसामुळे संरक्षण भिंत कोसळून नऊ जणांचा मृत्यू

हैदराबादेत मुसळधार पाऊस सुरू असून, इमारतीची संरक्षण भिंत कोसळून नऊ जणांचा मृत्यू झाला आहे

नवी दिल्ली । हैदराबादेत मंगळवारी मुसळधार पाऊसाने हजेरी लावली आहे. या पावसात एका कंपाऊंडची संरक्षण भिंत पडल्याने एका दोन महिन्यांच्या मुलासह आणखी नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत अनेक जण भिंतीच्या ठिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती मिळत असून, घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून, तेलंगानासह आंध्र प्रदेशात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहे.

गेल्या 48 तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे तेलंगाण्यात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक नदी-नाल्यांना पुर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हैदराबादेतील हिमायत सागर धरणाचे दरवाजे सुद्धा उघडण्यात आले आहे. हैदराबादेत गेल्या 24 तासात 20 सेंमी. पेक्षाही जास्त पावसाची नोंद करण्यात आली असून, हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज सुद्धा मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे लोकांनी बाहेर जाऊ नये असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.AM News Developed by Kalavati Technologies